नवी दिल्ली : इंडियन सुपर लीग स्पर्धेत रविवारी ओडिशा एफसी आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील सामना ४-४ असा बरोबरीत संपला.
To say it was an edge-of-the-seat contest is an understatement! 🔥#OFCKBFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/MqZ7QpcuJR
— Indian Super League (@IndSuperLeague) February 23, 2020
ओडिशा संघाकडून मैनुअल ओनवू याने १ ल्या, ३६ व्या आणि ५१ व्या मिनिटाला गोल करत हॅट्रटिक साजरी केली. ओडिशासाठी चौथा गोल मार्टिन पेरेज गुटेज याने ४४ व्या मिनिटाला केला.
ओडिशाच्या नारायण दास याने ६ व्या मिनिटाला केरला ब्लाॅस्टर्ससाठी पहिला गोल (आत्मघाती) केला. तर, राफेल मेस्सी बोलीने २८ व्या मिनिटाला दुसरा, बार्थोलोमियू ओगबेचेने ८२ व्या मिनिटाला तिसरा आणि ९० व्या मिनिटाला चौथा गोल केला.
ओडिशा व केरला ब्लास्टर्स यांचा स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. ओडिशा संघ स्पर्धेत १८ सामन्यातील २५ गुणांसह सहाव्या स्थानी तर केरला ब्लास्टर्सचा संघ १९ गुणांसह सातव्या स्थानी राहिला.