#ISL : नाॅर्थईस्टचा पराभव करत मुंबई सिटी टाॅप-४ मध्ये दाखल

नवी दिल्ली : डिएगो कार्लोसच्या गोलच्या जोरावर मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात शुक्रवारी नाॅर्थईस्ट यूनाइटेडचा १-० ने पराभव करत विजय नोंदविला आहे.

मुंबईकडून डिएगो कार्लोसने ४४ व्या मिनिटाला एकमेव व विजयी गोल केला. कार्लोसचा या सत्रातील हा दूसरा गोल आहे. मुंबईचा १५ सामन्यातील हा ६ वा विजय असून त्याचा संघ २३ गुणांसह आयएसएल (#ISL) गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहचला आहे.

नाॅर्थईस्ट यूनाइटेड संघाचा १३ सामन्यातील सलग चौथा व या सत्रातील सहावा पराभव आहे. यासह त्याचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.