नवी दिल्ली : एफसी गोवा संघाने बुधवारी झालेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेतील सामन्यात मुंबई सिटी एफसी संघाचा ५-२ असा पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह तीन गुण मिळवित एफसी गोवा संघाने आपले गुणतालिकेतील अव्वलस्थान कायम राखलं आहे.
The Islanders' top-four hopes are dealt a blow after the Gaurs hit 5⃣ at the Fatorda!#FCGMCFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/MjqIb8Zmsg
— Indian Super League (@IndSuperLeague) February 12, 2020
एफसी गोवा संघाकडून फेरान कोरोमिनासने (२० व्या आणि ८० व्या मिनिचाला) दोन गोल केले. हुयगो बोमोसने ३८ व्या मिनिटाला तर जैकीचंद सिंहने ३९ व्या मिनिटाला गोल केला.
मुंबई सिटी एफसी संघाकडून रोवलिन बोर्गेसने १८ व्या मिनिटाला पहिला व बिपीन सिंहने ५७ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सामन्याच्या ८७ व्या मिनिटाला मुंबईच्या मोहम्मद रफीकडून चुकून स्वत:च्याच गोलपोस्टमध्ये (आत्मघाती) गोल झाला.
या विजयासह एफसी गोवा संघाचे १७ सामन्यात ३६ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहेत. तर, मुंबईचा संघ १७ सामन्यातील २६ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.