इसिसने घेतली लंडन ब्रिज हल्ल्याची जबाबदारी

लंडन : मध्य लंडनमधील ब्रिजवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी गटाने घेतली आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते, तर हल्लेखोर दहशतवाद्यास पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते.

इसिसच्या अमाक या वृत्त संस्थेने याविषयी माहिती दिली आहे. इसिसच्याच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. साइट इंटेलिजन्स ग्रुप या जिहादी कारवायांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरही याबाबत माहिती दिली आहे. हल्लेखोर उस्मान खान हा दहशतवादी होता व त्याला सात वर्षांपूर्वी लंडन शेअर बाजारात बॉम्बस्फोटाचा कट, तसेच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी छावणी चालवणे या आरोपांखाली 2012 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.