दहशतवाद्याने न्यायाधीशाच्या दिशेने भिरकावला बूट

कोलकाता : बर्धवान स्फोटाच्या प्रकरणात अटक केलेला इसिसचा संशयित दहशतवादी अबू मुसा याने मंगळवारी भर न्यायालयात थेट न्यायाधीशाच्या दिशेने बूट भिरकावला. त्याच्या या मुजोर वर्तनाने न्यायाधिश प्रसेनजित विश्‍वास यांच्यासह सारेजण आवाक झाले.

मात्र या त्याचा नेम चुकून त्याचा बूट न्यायाधिसऐवजी एका वकीलाला लागला. त्यानंतर त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला. त्याला कोलकात्यातील प्रसिडन्सी कारागृहात ठेवण्यात आले आहे.

त्याला अटक केल्यानंतर वर्षभराने त्याने अलीपोर कारागृहातील सुरक्षा रक्षकावर 2017 मध्ये घातक शस्त्रांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता. अशा लोकांना इसिसकडून शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे विधान कारागृहमंत्र्यांनी त्यावेळी केले होते.

इसिस आणि जेएमबी या दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून मुसा याला 2016 मध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर तरूणांना दहशतवादी मार्गावर नेण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मुसा याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने अचानकपणे आरडाओरड सुरू करून न्यायाधीश प्रसेनजित बिस्वास यांच्या दिशेने बूट भिरकावला. मात्र, मुसाचा नेम चुकल्याने तो बूट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वकिलाला लागला. मानवनिर्मित कायद्यांवर माझा विश्‍वास नाही. त्या कायद्यांमुळे मला न्याय मिळणार नाही, असे म्हणत मुसाने बूटफेक केल्याचे समजते. त्याच्या बूटफेकीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने सुनावणी थांबवण्यात आली. पोलिसांनी तातडीने पुढे सरसावत मुसाला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी पुन्हा तुरूंगात करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.