वॉशिंग्टन – अमेरिकेने सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या एका मोठ्या म्होरक्याचा खात्मा करण्यात आला आहे. यूएस सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, माहेर अल-अगल असे त्याचे नाव असून तो मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार झाला आणि त्याचा एक विश्वासू साथीदारही यात गंभीर जखमी झाला आहे.
अमेरिकेने तुर्कीच्या सीमेजवळ असलेल्या उत्तर-पश्चिम सीरियातील जिंदारिस या शहराबाहेर हा हल्ला केला. सीरियात इस्लामिक स्टेटने अनेक भागावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
रशिया-युक्रेनच्या अधिकाऱ्यांची इस्तंबुलमध्ये भेट; “या” विषयावर झाली चर्चा
त्यांना तेथून हुसकाऊन लावण्यासाठी सीरियन लष्कराच्या फौजा आणि सीरियाबाहेरील त्यांचे काही मित्र देश सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तथापि अजूनही त्यांना तेथून पुर्णपणे हुसकाऊन लावण्यात पुर्ण यश आलेले नाही. तथापि अमेरिकेने टिपलेला हा म्होरक्या हे एक लक्षणीय यश मानले जात आहे.
Russia-Ukraine War: रशियाच्या दारुगोळ्याच्या गोदामांवर युक्रेनचे हल्ले