इसिस, अल कायदाचा विस्तार आफ्रिकेमध्ये शक्‍य; संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक गटाचा अंदाज

न्यूयॉर्क  – इस्लामिक स्टेट आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटना आफ्रिकेमध्ये आपले जाळे आणखी वाढवण्याची शक्‍यता असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. जगभरातील जिहादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक गटाने सुरक्षा परिषदेला दिलेल्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आफ्रिकेला सध्या दहशतवादाचा सर्वाधिक धोका आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांच्या घातपाती कारवायांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या अन्‌ ठिकाणच्या संख्येपेक्षा अधिक आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

या दहशतवादी संघटनाना स्थामिक पाठबळ देखील मिळत आहे. त्यामुळे या दहशतवादी संघटनांना अधिक शस्त्रास्त्रे आणि अधिक पैसाही मिळू लागला असण्याची शक्‍यता आहे.
ज्या ठिकाणी अशा जिहादी गटांवर अंकुश ठेवला जात नाही तेथे त्यांची वाढ अधिक जोमाने होते.

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या फौजा 31 ऑगस्टपर्यंत माघारी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडण्याची शक्‍यता आहे, अशी शक्‍यताही या अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे.

सोमालियामध्ये अमेरिकेचे सैन्य माघारी गेले आहे. आफ्रिकन संघटनेनेही तेथून अंशतः माघार घेतली आहे. त्यानंतर सोमाली विशेष फौजांना तेथे अल कायदावर नियंत्रण ठेवणे अवघड जाऊ लागले आहे. मालीमध्ये फ्रान्सने दहशतवादविरोधी कारवाई थांबवायला सुरुवात केली आहे.

त्याचवेळी अल कायदाशी संबंधित गटांनी पुन्हा जमवाजमव करायला सुरुवात केली आहे, तशीच स्थिती मोझंबिकमध्येही निर्माण होते आहे, असा दाखलाही या अहवालामध्ये देण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.