अफगाणिस्तान प्रसारण मंत्रालयावरील हल्ल्याची जबाब्दारी इसिसने स्वीकारली

बैरुत – अफगाणिस्तनची राजधानी काबुलमध्ये प्रसारण मंत्रालयाच्या इमारतीवर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये 10 जण ठार झाले होते. तर मंत्रालयातील सुमारे 2 हजार जण अडकून पडले होते.

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सर्वप्रथम काबुलच्या मध्यभागी असलेल्या प्रसारण मंत्रालयाजवळ स्फोटकांचा स्फोट घडवून आणला आणि नंतर आत प्रवेश केला. तेंव्हा अफगाणी सुरक्षा रक्षकांबरोबर दहशतवाद्यांची जोरदर चकमक झाली. या चकमकीमध्ये 7 नागरिक अणि 3 सुरक्ष रक्षक असे एकूण 10 जण मरण पावले होते, असे गृहमंत्रालयाने म्हटले होते. या चकमकीदरम्यान मरण पावलेल्या आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे रविवारी जाहीर करण्यात अले. स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता सुरू झालेली चकमक संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. या चकमकीदरम्यान सर्व आत्मघातकी हल्लेखोर मारले गेले आणि मंत्रालयामध्ये अडकून पडलेले सर्व 2 हजार कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका झाली, असे गृहमंत्रालयाने ट्‌विटरवरच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
प्रसारण मंत्रालयाची 18 मजली इमारत काबुलमधील सर्वात उंच इमारत असल्याचे मानले जाते. इमारतीतील सर्व कर्मचारी भीतीने सर्वात वरच्या मजल्यावर चढून बसले होते. त्या सर्वांना कमांडोंनी सुखरूप बाहेर काढले. गेल्या आठवड्यात लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्लाही झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.