राष्ट्रपतींच्या हस्ते इशांतचा गौरव

अहमदाबाद – जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात असलेल्या या सामन्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थितीत असल्याने हा सामना खास ठरला. याचसोबत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्यासाठीही हा सामना विशेष ठरला.

सामना सुरू होण्यापूर्वी इशांतचा खास गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. हा सामना इशांतचा शंभरावा कसोटी सामना ठरला. त्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते इशांतला खास मानचिन्ह तसेच अमित शहा यांच्या हस्ते भारतीय संघाची कॅप प्रदान करण्यात आली. 

100 कसोटी सामन्यांचा पल्ला गाठणारा इशांत भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी महान गोलंदाज व माजी कर्णधार कपिल देव यांनी हा पल्ला पार केला होता. त्यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. इशांतने 2007 साली बांगलादेशविरूद्ध कसोटी पदार्पण केले. बुधवारी सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या या कसोटी मालिकेत इशांतने 300 बळींचा पल्लाही त्याने पार केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.