मीरा नायरच्या “अ सुटेबल बॉय’मध्ये ईशान खट्टर

ईशान खट्टरच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्याला आता मीरा नायरच्या ‘अ सुटेबल बॉय’म्ध्येही मध्यवर्ती रोल मिळाला आहे. विक्रम सेठ यांच्या “अ सुटेबल बॉय’ याच नावाच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. स्वतः ईशान खट्टरने सोशल मिडीयावरच्या पोस्टमध्ये आपल्या नव्या रोलबाबतची माहिती दिली आहे.

मीरा नायरसारख्या अद्वितीय डायरेक्‍टर आणि तितक्‍याच भारी तंत्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने ईशानने आनंद व्यक्‍त केला आहे. मीरा नायरच्या सिनेमातून जागतिक पातळीवरच्या प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याने तो खूप खुशीत आहे. नवोदित तनया माणिकतला आणि तब्बूबरोबर तो दिसणार आहे. “अ सुटेबल बॉय’ची कथा स्वातंत्रोत्तर कालखंडातील आहे.

एका मुलीसाठी विवाहयोग्य मुलाची निवड करण्यसाठी काही कुटुंबांचा खटाटोप सुरू असतो. त्यामध्ये ईशानला मान कपूर नावाच्या युवकाचा रोल साकारायचा आहे. ईशानच्या “धडक’ला बॉलिवूडमध्ये खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्या अनुभवाच्या आधारे ईशानची कारकिर्द एकदम भन्नाट सुरू झाली आहे.

त्याला करण जोहरने आपल्या पुढच्या सिनेमामध्ये घेतल्याचीही चर्चा होती. मात्र काही कारणामुळे करण जोहरने ईशानला आपल्या कोणत्याच सिनेमामध्ये न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)