संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर?

बॉलीवूडमधील अनेक युवा कलाकार सध्या आपल्या डेब्यू चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पुढील चित्रपट साईन करण्यात व्यस्त आहेत. “बियॉन्ड द क्‍लाउड्‌स’ आणि “धडक’ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा ईशान खट्‌टर आता फिल्म इंडस्ट्रीमधील बहुचर्चित चेहरा बनला आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला होता आणि ईशानच्या अभिनयाची स्तुती देखील केली होती.

बॉलीवूडमधील ईशानचा परफॉर्मेंस पाहता प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली खूपच प्रभावित झाले आहेत. त्यांनी ईशानला आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑफरही दिली आहे. पण, याबाबत ऑफिशल अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही. कारण त्याबाबतच्या सर्व फॉर्मेलिटीज अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. याबाबत सर्व गोष्टी निश्‍चित होताच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान, ईशानचा भाउ शाहिद कपूर हा संजय लीला भंसालीच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या “पद्मावत’मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहसोबत झळकला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच “गली बॉय’साठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसह ईशान खट्‌टरनेही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.