इशा जोशी, सनत बोकिल यांचा उपान्त्य फेरीत प्रवेश

तिसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
पुणे: अग्रमानांकीत एशा जोशी, स्वप्नाली नराळे, सलोनी शहा, उज्वला गायकवाड यांनी 21 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत तर अग्रमानांकीत सनत बोकिल, रजत कदम, आर्यन पानसे आणि गौरव लोहपात्रायांनी 21 वर्षांखालील मुलांच्या आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
21 वर्षांखालील मुलींच्या उपान्त्यपूर्व फेरीतील सामन्यात अग्रमानांकीत इशा जोशीने नववे मानांकन असलेल्या वेदिका भेंडेचा 11-2, 11-2, 11-8, 11-8 असा सहज पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला.
तर दुसऱ्या सामन्यात पाचवे मानांकन असलेल्या स्वप्नाली नरळेने चौथे मानांकन असलेल्या अंकिता पटवर्धनचा 11-5, 11-8, 14-12, 11-8 असा पराभव करत स्पर्धेत धक्‍का दायक निकालाची नोंद केली. तर अन्य एका सामन्यात तिसरे मानांकन असलेल्या सलोनी शहाने सहावे मानांकन असलेल्या सिद्धी अचरेकरचा 11-5, 11-4, 11-4, 9-11, 6-11, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तर अखेरच्या सामन्यात सातवे मानांकन असलेल्या उज्वला गायकवाडने दुसऱ्या मानांकीत मृन्मयी रायखेलकरचा 11-5, 7-11, 7-11, 11-4, 11-6, 11-6 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्य फेरी गाठली.
तर 21 वर्षांखालील मुलांच्या उपान्त्यपूर्व फेरीत अग्रमानांकीत सनत बोकिलने आठवे मानांकन असलेल्या अनय कोवलमुडीचा 9-11, 11-9, 11-7, 14-12, 11-7 असा पराभव करत स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आपला प्रवेश निश्‍चीत केला. तर दुसऱ्या सामन्यात चौथे मानांकन असलेल्या रजत कदमने पाचवे नानांकन असलेल्या आदर्श गोपालचा 11-7, 11-6, 8-11, 11-13, 11-9, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करत विजयी आगेकूच केली.
तर तिसऱ्या सामन्यात आकरावे मानांकन असणाऱ्या आर्यन पानसेने तिसरे मानांकन असलेल्या आरुश गळपल्लीचा 8-11, 11-7, 11-5, 6-11, 11-7, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करत स्पर्धेत आता पर्यंतचा सर्वात खळबळजनक निकाल नोंदवला. तर सहावे मानांकन असणाऱ्या गौरव लोहपात्रेने पंधरावे मानांकन असलेल्या साई बगाटेचा 11-8, 11-5, 9-11, 11-13, 11-4, 11-4 असा संघर्षपूर्ण पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली.
तर 12 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अग्रमानांकीत वेदांग जोशी, द्वितिय मानांकीत अद्वैत ढवळे यांनी विजयी आगेकूच केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)