इशा जोशी, गौरव लोहापत्रेयांना विजेतेपद

तिसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे- अग्रमानांकीत इशा जोशी आणि दहवे मानांकन असलेल्या गौरव लोहापत्रेयाने तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या 21 वर्षांखालिल मुले व मुलींच्या गटातील अंतीम सामन्यात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना स्पर्धेचे विजेपद आपल्या नावे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 21 वर्षांखालिल मुलांच्या गतातील अंतीम सामन्यात दहवे मानांकन असलेल्या गौरव लोहपात्रेने अग्रमानांकित सनत बोकीलचा 12-10, 11-9, 11-7, 11-6 असा धक्‍कादायक पराभव करताना स्पर्धेतील आपल्या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. सामना सुरू होण्यापुर्वी सर्वांना सनत बोकिलच्या विजयाची अपेक्षा होती मात्र सामन्याच्या सुरूवाती पासूनच गौरवने सनतवर दडपण वाढवताना उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन सादर केले. पहिला सेट 12-10 असा थोडक्‍यात जिंकल्यानंतर गौरवचा आत्मविश्‍वास बळावला आणि त्याने दुसरा सेट 11-9 असा एकतर्फी आपल्या नावे केला. मात्र यानंतर तिसऱ्या सेट मध्ये सनतने पुनरागमन करायचा थोडाफार प्रयत्न केला मात्र गौरवने त्याचा हा प्रयत्न हाणुन पाडत तिसरा सेट 11-7 असा एकतर्फीच आपल्या नावे केला. तर चौथा सेटही जिंकत गौरवने सामना आपल्या नावे केला.

तत्पूर्वी उपान्त्य सामन्यात गौरवने आकरावे मानांकन असलेल्या आर्यन पानसेचा 12-10, 11-7, 8-11, 11-9, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करताना अंतीम सामन्यात प्रवेश केला होता तर सनत बोकिलने चौथे मानांकन असलेल्या रजत कदमचा 11-9, 11-7, 11-8, 10-12, 11-8 असा पराभव करत अंतीम फेरीतील आपले स्थान पक्‍के केले होते.

तर 21 वर्षांखालिल मुलींच्या सामन्यात अग्रमानांकीत इशा जोशीने तीसरे मानांकन असलेल्या सलोनी शहाचा 11-5, 11-7, 11-5, 11-5 असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. अपेक्षे प्रमाणे इशा जोशीने सामन्याच्या सुरूवाती पासूनच सलोनीवर वर्चस्व गाजवायला सुरूवात केली होती त्यामुळे पहिल्याच सेट मध्ये सलोनीवर दबाव आला आणि तीने हा सेट 11-5 असा एकतर्फी गमावला. या सेट मध्ये एकतर्फी विजय मिळाल्यानंतर सलोनी पुढील तीन्ही सेट एकतर्फीच आपल्या नावे केले.

तत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात सलोनीने सातवे मानांकन असलेल्या उज्वला गायकवाडचा 6-11, 7-11, 11-5, 11-8, 7-11, 11-4, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करताना अंतीम फेरीत धडक मारली तर इशा जोशीने पाचवे मानांकन असलेल्या स्वप्नाली नरळेचा 11-9, 11-8, 11-8, 8-11, 11-9 असा पराभव करताना अंतीम फेरी गाठली.
तर स्पर्धेतील 12 वर्षांखालील कॅडेट बॉईज गटात अग्रमानांकित वेदांग जोशी, चौथे मानांकन असलेला नंदीश पटेल, सहावे मानांकन असलेला निशांत गदरे व दुसरे मानांकन असलेल्या अद्वैत ढवळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तर मुलिंच्या गटात अग्रमानांकित देवयानी कुलकर्णी, दुसरे मानांकन असलेली आनंदीता लुनावत, तीसरे मानांकन असलेली राधिका सकपाळ व चौथे मानांकन असलेली साक्षी पवार यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपान्त्यफेरी गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)