ईशा देओल पुन्हा आई झाली

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पुन्हा एकदा नाना नानी बनले आहेत. त्यांची मोठी कन्या ईशा देओलने 10 जूनला आणखी एका कन्येला जन्म दिला आहे. ईशाने स्वतःच्या सोशल मिडीया अकाउंटवरून ही आनंदाची बातमी आपल्या फॅन्सना दिली आहे. ईशाने एक फोटो शेअर केला आहे आणि आपल्या कन्येचे नावही जाहीर केले आहे. तिच्या या नव्या कन्येचे नाव मिराया असे ठेवले गेले आहे.

सर्व निकटवर्तीयांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ईशाने सर्वांचे आभारही मानले आहेत. ईशा देओल आणि भरत तख्तानीचे लग्न 2012 साली झाले आणि ईशाच्या पहिल्या मुलीचा जन्म 2017 मध्ये झाला होता. तिचे नाव राध्या ठेवले आहे. यावर्षी जानेवारीमध्ये ईशाने आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा वेगळ्याच पद्धतीने केली होती.

तिने तिची मोठी मुलगी राध्या एका सोफ्यावर बसल्याचा फोटो शेअर केला होता आणि “लवकरच माझे प्रमोशन होणार आहे. मी आता मोठी बहिण होणार आहे.’ असा राध्याच्या शेजारीच मेसेज लिहीला होता. प्रेग्नन्सीच्या काळात ईशा खूप उत्साहात होती. ती आपले “बेबी बंप’सह फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.