मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असतो. अलीकडेच रणबीर टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर दिसला होता, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
यादरम्यान सर्वांच्या नजरा त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर गेल्या. रणबीरच्या मोबाइल वॉलपेपरवर आलिया किंवा त्याच्या लेकीचा फोटो नसून वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा फोटो दिसला. जे पाहिल्यानंतर चाहते रणबीरचे जोरदार कौतुक करत आहेत. लूकबद्दल बोलायचे तर रणबीर लांब दाढी, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये सुंदर दिसत आहे.
या वर्षी रणबीर कपूरचे एक नाही तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचा आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही समोर आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहे, तर याशिवाय अभिनेता ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ऋषी कपूर यांचा मृत्यू कसा झाला?
30 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्याला कर्करोग झाला होता. मृत्यूच्या सुमारे 2 वर्षांपूर्वी त्यांना ल्युकेमियाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी तो अमेरिकेलाही गेला होता. पण कॅन्सरशी लढाई जिंकता आली नाही. एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांचे निधन झाले.