अहमदाबाद – जनतेचं पोट रिकामं असताना त्यांना योग करायला लावता, हीच तुमची देशभक्ती आहे का? अशा शब्दात पंजाबचे मंत्री आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात एका प्रचार रॅलीदरम्यान ते बोलत होते.
सिद्धू म्हणाले, लोकांची पोटं रिकामी आहेत आणि तुम्ही त्यांना योगा करायला लावता, नरेंद्र मोदी हीच तुमची राष्ट्रभक्ती आहे का? सर्वांना आता तुम्ही रामदेव बाबाच बनवून टाका. जनतेचे पोटं रिकामे आहे आणि त्यांना योग करायला लावता आहात. तसेच जनतेचा खिसा रिकामा असताना त्यांना तुम्ही बॅंकांमध्ये खाती कशी खोलायला लावता? असा सवालही त्यांनी केला आहे.