मुंबई – आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आणि पक्ष बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असूनही हजेरी लावली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अनुपस्थित होते. यामुळे अजितदादा नाराज आसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.अशात राष्ट्रवादीला मंथन शिबीर जास्तच भारी पडतंय अशी टोलेबाजी आता मनसे नेत्याकडून करण्यात आली आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्च्यांनबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणतात,आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात.ही बाब काही पचनी पडत नाही.तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून.गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे.कूछ तो गडबड हैं.” अशी टोलेबाजी करत काळे यांनी अजून एक ट्विट केले आहे ज्यात त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचा देखील दाखल दिला आहे.
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये गजानन काळे म्हणतात,”आम्ही तर कालच म्हणालो होतो आज निलम ताई गोऱ्हे पण म्हणाल्या अजित दादांची गॅरंटी नाही…काँग्रेसने विरोधी पक्षनेते केले ते विखे पाटील पण असेच गेले होते आता या राज्याचा दुसरा विरोधी पक्ष नेता पण जाण्याची चिन्ह आहेत का ? मंथन शिबिर जास्तच भारी पडलय अस दिसतय राष्ट्रवादीला” असा टोला यावेळी काळेंनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.
आम्ही तर कालच म्हणालो होतो आज निलम ताई गोऱ्हे पण म्हणाल्या अजित दादांची गॅरंटी नाही …
काँग्रेसने विरोधी पक्षनेते केले ते विखे पाटील पण असेच गेले होते आता या राज्याचा दुसरा विरोधी पक्ष नेता पण जाण्याची चिन्ह आहेत का ? …
मंथन शिबिर जास्तच भारी पडलय अस दिसतय राष्ट्रवादीला … https://t.co/Y4YyMjC7v4— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 6, 2022
नीलम गोर्हे काय म्हणाल्या होत्या नेमकं
पुण्यातील आमदारांच्या निधीविषयी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या,”गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हाच मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे,बापट राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने निधी द्यायचे. आता तसं राहीलं नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. आता महाविकास आघाडी तयार झाली आहे. त्याचबरोबर अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही. पूर्वी जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं आमची मविआ सहकारी दिसत आहेत” असं गोऱ्हे यांनी म्हंटले होते. हाच धागा पकडून गजानन काळे यांनी अजित पवारांच्या नाराजीबाबत भाष्य केल्याचे पाहायला मिळते.