शहर राहण्यायोग्य आहे कि नाही ?

सर्वेक्षणाला प्रारंभ : दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी (प्रतिनिधी) – नागरिकांना त्यांच्या महापालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे योग्य राहणीमान निर्माण व्हावे, या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. 29 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार असून शहरातील सुविधांबाबत नागरिकांची मते जाणून घेवून सहभागी शहराचा क्रमांक निश्‍चित करण्यात येणार आहे. यामध्ये अडीच लाख नागरिकांनी सहभाग घेणे आवश्‍यक आहे. दरम्यान, गतवर्षी राहण्यायोग्य शहरात पिंपरी-चिंचवड 69 व्या क्रमांकावर होते.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली. या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह देशातील 114 व राज्यातील 12 शहरांचा सहभाग आहे. सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये राहण्या योग्य शहर, महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेवून शहराचा क्रमांक निश्‍चित करण्यात येणार आहे.

उद्योग, नोकरी, शहराची अर्थव्यवस्था, दळणवळण, पर्यावरण, सुरक्षितता, गुन्हेगारी याबाबत नागरिकांचे काय मत आहे हे जाणून घेतले जाणार आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत नागरिकांना तीन निर्देशाकांवर प्रश्‍न विचारण्यात येतील. यामध्ये शिक्षण व आरोग्य सुविधा यांचा दर्जा, उपलब्धता व क्रयशक्ती यांसारख्या प्रश्‍नांचा समावेश असेल. यामध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तरासाठी पूर्ण सहमत, सहमत, समाधानी, असमाधानी व पूर्ण असमाधानी हे पाच पर्याय उपलब्ध आहेत.
राहणीमान सर्वेक्षण 2019 चा क्‍यूआर कोड स्कॅन करून या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा.

नागरिकांनी राहणीमान सर्वेक्षणामध्ये सहभाग घेवून सर्व प्रथम (हीीं://शेश्र2019.ीेस/लळींळूशपषशशवलरलज्ञ) या संकेतस्थळावर जाऊन तसेच सोबतचा क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सर्वेक्षणासाठी विभागप्रमुखांची कार्यशाळा घेतली आहे. त्याकरिता दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.