मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा डेट करत असल्याच्या बातम्या बी-टाऊनमध्ये गाजल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही तरुण स्टार्स एकमेकांच्या प्रेमात आहेत, आणि लवकरच ते एकत्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
रिपोर्टनुसार अगस्त्य आणि सुहाना डेट करत आहेत. दोघे गेल्या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. “अगस्त्यने कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस ब्रंचमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती.” अशा चर्चाही रंगल्या होत्या.
या जोडीने त्यांच्या डेब्यू प्रोजेक्टच्या सेटवर बराच वेळ एकत्र घालवला, ज्यामुळे ते एकमेकांशी जुळले आणि नंतर डेटिंगला सुरुवात केली. अगस्त्य आणि सुहानाची अद्याप त्यांचे नाते अधिकृत करण्याचा विचार नाही, परंतु प्रॉडक्शन हाऊसमधील बहुतेक लोकांना ऑगस्ट 2020 मध्येच त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली. अगस्त्याची आई श्वेता बच्चन नंदा “सुहानावर प्रेम करते” आणि “त्या नात्याला मान्यता देखील दिली आहे.’ मात्र या सर्व चर्चांवर अगस्त्य किंवा सुहानाने अद्याप या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.