नवी दिल्ली – वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या
आंदोलनाचा एक फोटो शेअर करून आपण याविषयी का बोलत नाही, एवढेच वाक्य प्रसिद्ध
पॉप गायिका रिहानाने ट्विट केले.
रिहानाचे ट्विटरवर तब्बल दहा कोटींपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्यांच्या यादीत ती चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे तिने केलेल्या ट्विटरवरून मोठा गदारोळ माजला. बुधवारी दिवसभर भारतातून अनेकांनी गुगल सर्चवर रिहाना मुस्लिम आहे का असा सर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर काही वेळातच रिहाना कोण आहे याचा भारतातून गुगलवर मोठ्या प्रमाणात शोध
घेण्यात आला. रिहानाच्या ट्विटनंतर सोशल मिडियावर दोन गट पडले. काहींच्या मते
रिहानाच्या ट्विटमुळे शेतकरी आंदोलनाकडे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले जाईल.
कारण तिचे जगभर दहा कोटींपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, तिचे
हे ट्विट पेड आहे. अनेकीं तिच्या या ट्विटवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
भारतात तर तिच्या ट्विटविरोधात ट्रेंड चालवण्यात आले. तिला ज्या विषयाची माहिती नसते
त्याविषयी तिने बोलू नये असा सल्लाही अनेकांनी दिला. इतके दिवस शेतकरी आंदोलनाबाबत
एक शब्दही न उच्चारणारे क्रिकेटपटू आणि बॉलिवुडमधील अभिनेते तिच्या ट्विटनंतर देशाच्या
एकतेबद्दल चिंता व्यक्त करू लागले आहेत.
त्याचबरोबर अनेकांनी इज रिहान मुस्लिम? आणि रिहान रिलिजन असा गुगलवर सर्च केल्याचे आढळून आले आहे. विशेषतः पंजाब, हरियाना, दिल्ली, चंडीगड, जम्मू-काश्मीर भागातून हा सर्च करण्यात आला आहे.