काविळाची औषधं करोना उपचारासाठी प्रभावी ? वापराला हवी परवानगी

नवी दिल्ली – झायडस कॅडिला कंपनीचे काविळीवरचे प्लेग्लॅटेड इंटरफेरॉन अल्फा-2 बी हे औषध सध्या बाजारात उपलब्ध आहे. या औषधाचा करोना रूग्ण बरे करण्यासाठी चांगला उपयोग होत असल्याचा कंपनीचा दावा असून त्यासाठी या औषधाला अनुमती देण्यात यावी अशी मागणी या कंपनीच्यावतीने भारताच्या औषध नियंत्रण महासंचालनालयाकडे करण्यात आली आहे.

कंपनीचे काविळीवरील हे औषध पेगीहेप नावाने विकले जात आहे. त्याचा करोना रूग्णांवर खूप चांगला परिणाम दिसून येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. करोना रूग्णाला अगदी सुरूवातीच्या काळातच हे औषध दिले तर तो पेशंट फार लवकर बरा होतो व त्याच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होत नाही असे कंपनीचे म्हणणे आहे.

याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या आम्ही घेतल्या आहेत त्यात आम्हाला अत्यंत चांगले निष्कर्ष आढळून आले आहेत असेही कंपनीने म्हटले आहे. या औषधाचा एकच डोस पुरेसा होतो आणि सदर औषध बऱ्यापैकी स्वस्तही आहे. त्यामुळे करोना रूग्णांना याचा चांगला लाभ होईल असेही कंपनीने म्हटले आहे.

करोनाच्या रूग्णामध्ये श्‍वसन यंत्रणेवर ताण येणे आणि त्याला त्यामुळे ऑक्‍सिजनचा पुरवठा करणे असे प्रकार करावे लागतात. या डोस मुळे रूग्णाच्या श्‍वसन यंत्रणेवरील ताण कमी होतो आणि ऑक्‍सिजन पुरवठ्याची गरज कमी भासते असेही कंपनीचे म्हणणे आहे. या औषधांच्या करोना रूग्णांवरील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 20 ते 25 देशांतील रूग्णांवर घेण्यात आल्या आहेत. या टप्प्यात एकूण 250 रूग्णांवर या ओैषधाचा उपयोग तपासण्यात आला. त्याचे चांगले निष्कर्ष निघाले आहेत असे कंपनीने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.