जॅकलीन-दीपिका करताहेत मोलमजुरी? 

मध्य प्रदेशमधील खरगोन येथील मनरेगामधील जॉबकार्डचा एक घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे.

यात एक असा प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे सर्वच जण आश्‍चर्यचकित झाले आहेत. तो म्हणजे, मनरेगा मोलमजुरीच्या जॉब कार्डमध्ये चक्‍क अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे फोटो आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्डस्‌वरून जून आणि जुलै महिन्यातील मजुरीचे पैसे देखील काढण्यात आले आहे.

या घोटाळ्यात असे अनेक जॉब कार्ड आढळून आले आहेत. ज्यावर अभिनेत्रींचे फोटो वापरून लाखो रुपयांचे काढण्यात आले आहेत. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा जॉब कार्डच्या योग्य भागधारकांना मनरेगामध्ये काम करण्यासाठी त्यांची रक्‍कम मिळाली नाही.

याबाबत त्यांनी ऑनलाइन चौकशी केली असता त्यांची कार्डे बनावट असल्याचे आढळले. दरम्यान, इंटरनेटवर आपल्या जॉब कार्डवर अभिनेत्रींचे फोटो पाहून अनेक गावांतील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यातून त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.