मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणामुळं राज्याचं राजकारण तापलं आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. त्यात आता भाजपने या प्रकरणावरून शिवसेनेवर सनसनाटी आरोप केले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता ? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत ? वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे ? वाझे सारख्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का?’, असे प्रश्न कदम यांनी विचारले आहेत. त्यांनी ट्विट करून सरकारवर निशाना साधला.
क्या अंबानी जैसे उद्योगपतीसे जल्द ही होनेवाले BMC चुनाव के लिए डराकर धन जुटाना किसीका मकसद था ?
हमारा सवाल है शिवसेना तथा उनके साथी वाजे की खुलकर वकालत करते हुए उसका बचाव क्यों कर रहे है ?
क्या संगीन आरोप वाले शख्स को बचाना उचित है ?— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 16, 2021
‘महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करतंय का? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का? या दृष्टीनं तपास व्हावा अशी आमची मागणी आहे,’ असं राम कदम यांनी म्हटलं.