व्यायाम हा हृदयविकारास खरच उपयुक्त आहे का? वाचा सविस्तर बातमी

पुणे – प्रथमपासून सर्व प्रकारचे व्यायाम करायची सवय असेल तर हृदयविकाराला (heart disease)  दूर ठेवू शकाल. ताकदीचे, चिवटपणाचे, लवचिकपणाचे- दमश्‍वासाचे – एरोबिक अनएरोबिक, वेट ट्रेनिंग, योगासने चालणे, पोहणे, सायकलिंग व्यायामाचा तोल आठवड्यात साधावा. रोजच्या कामाइतकेच किंबहुना जास्त महत्त्व व्यायामाला हवे. तोही नियमित सातत्याने खंड न पडता केला जावा. 

रुग्णांनी मात्र थोड्या प्रमाणात डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच व्यायामाची पद्धत निवडावी  सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोके शांत ठेवून ध्यानधारणेची सवय लावली, अतिरेकी, महत्त्वाकांक्षी, घायकुतीला येणारा अवाजवी ताणतणाव होणारा स्वभाव बदलावा, ताणाला योग्य विरेचन दिले योग्य प्रमाणात झोप (10 ते 6) घेतली तर शरीर व मनाला विश्रांती मिळेल. जेव्हा मिळायला हवी तेव्हा मिळेल व यामुळे हृदयविकारच (heart disease) काय सर्वच रोगांपासून आपण दूर राहू.

परंतु सध्याचे जग, त्यातील जीवनपद्धती, स्पर्धा, धोरणे पाहता एकदातरी हृदयविकाराची (heart disease) वा त्याच्या मित्रांची (रक्तदाब, मधुमेह) संगत लागली की एखादा फटका बसला तर आणि तरच रुग्ण बदलतो, बदलू शकतो ही वस्तुस्थिती आहे. खेड्यात वा शहरात हृदयविकारात (heart disease) फारसा फरक नाही की जो एकेकाळी होता.

निरामय आरोग्याचा लाभ घ्यायचा आयुष्य भरभरून जगायचे असेल तर आहारात योग्य बदल करा. नियमित व्यायाम करा. शास्त्रीय संगीत ऐका. वाचन चिंतन मनन करा. आनंदात जगा हसत खेळत रहा. रोगांचे शत्रू व्हा. थोडा कमी पैसा मिळाला तरी चालेल, पण स्वास्थ्याला हानिकारक गोष्टी करून पैसा मिळवण्याचा हव्यास धरू नका.

थोडक्‍यात समाधान माना; परंतु अभिमानाने सांगायची वेळ येऊ दे “”मी या रोगांपासून कटाक्षाने दूर राहिलोय/राहिलेय कारण मी योग्य जीवनशैली स्वीकारलीय, मी तर स्वीकारलीय. तुम्ही कधी स्वीकारणार?”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.