करोना हा हवेतून पसरणारा रोग आहे का?

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 1354 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणा पेक्षा जास्त बळी गेला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवा. हात नीट स्वच्छ धुवा असा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाव्हाययरसच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्याने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर कोरोनाव्हायरसची लागण होते आहे.

मात्र ज्या हवेत आपण श्वास घेत आहोत, त्या हवेमार्फत  तर आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका तर नाही ना, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. गूगलवर हाच प्रश्न अनेकांनी विचारलेला दिसतो. करोना हा हवेतून पसरणारा रोग आहे का? या प्रश्नच उत्तर न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेत 3 तासांपर्यंत राहू शकतो.

यावर  जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचा सूचना दिल्यात. त्यामुळे हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी व्हायरसला यासाठी एअरबोर्न करून पाहिलं कारण अशा अनेक वैद्यकीय प्रक्रिया आहेत, ज्यामुळे रुग्णाच्या शरीरातील व्हायरस हवेत पसरतो आणि हा व्हायरस हवेत राहिल्यास डॉक्टर, नर्सच्या आरोग्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळेच या संशोधनानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.