बाळाला आईचे दूध पुरेसे आहे का?

पुणे – प्रत्येक वेळेला बाळ रडायला लागले की त्याला भूक लागली असते. असं नाही. बरेचदा त्याचे काही दुखत असते, खेळायचे असते इ. त्यांच्याकडे रडल्याशिवाय दुसरे काही माध्यम नसते. व्यक्त करायला त्याच्या तोंडाशी बोट द्यावे, त्याने जर आ केला तर त्याला भूक लागली समजावे. बाळाला दूध पुरेसे आहे की नाही हे पडताळणे सोपे आहे. स्तनपान झाल्यावर ते सलग 2-3 तास शांत झोपते का?

24 तासांत 6-8 वेळा लघवी करते 4-6 वेळा शी करत आहे का? त्याव्यतिरिक्त दिवस बाळाचे वजन महिन्याकाठी 1/2 किलो वाढते का?

6 महिन्यात बाळाचे वजन पहिल्यापेक्षा दुप्पट पाहिजे व वर्षाकाठी तिप्पट पाहिजे.

पहिले 6 महिने आईला काही त्रास नसल्यास व दूध उतरत असल्यास निव्वळ स्तनपान द्यावे. बाळाच्या वाढीसाठी तेच योग्य असते.

6 महिन्यांनंतर बाळाच्या पोषकतत्त्वांच्या गरजा वाढतात. त्यामुळे पूरक आहार सुरू करावा, पण स्तनपान बाळ 1/2-2 वर्षांचे होईपर्यंत चालू ठेवावे.

यशस्वी स्तनपान हे आईच्या आहारावरदेखील निर्भर असते. स्तनदा मातेचा आहार संतुलित असावा व त्यात सर्व पोषक तत्त्वे भरपूर असावीत. विशेषतः प्रथिने, कॅल्शियम व ऊजा (अतिउर्जा) युक्त स्त्रोत तिच्या आहारात असावे.

दूधस्त्राव वाढण्यासाठी आहारात सरश्ररलीेंसेर्सीशी (गॅलॅगटोगॉग्स) जसे बाजरी, सुकामेवा, अळीव, जवस, सब्जाचे बी, तीळ, खसखस, मेथी (दाणे व भाजी), डिंक, लसूण, सुके मासे, दूध, लोणी, तूप इ.चा सामावेश असावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.