पुणे – दिवसेंदिवस शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ खड्डेच नाहीत तर यामुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात येते. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी या खड्ड्यांची दुरुस्ती करत नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. सरकारनगर भागांतील पासलकर चौकामध्ये ड्युटी असणाऱ्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना त्रास होऊ नये या हेतूने खड्डे बुजविले.