Arjun Kapoor | अभिनेता अर्जुन कपूरने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात खलनायकाची भूमिका उत्तमरित्या साकारली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. मात्र अनेकदा अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे.
अलीकडेच मलायकासोबत ब्रेकअप झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आता त्याने एका मुलाखतीत एकटेपणावर भाष्य केले आहे. अर्जुन कपूर गेली अनेक वर्ष मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं असून मी सिंगल आहे असा अर्जुनने खुलासा केला होता.
एका मुलाखतीत अर्जुन कपूरला एकाकीपणाबाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी अभिनेत्याने उत्तर दिले की, “2014 मध्ये या विषयावर चर्चा केली होती. आईचं निधन झालं आणि माझी बहीण दिल्लीत शिकत होती. मी सिनेमाच्या कामानिमित्त प्रवास करत होतो. या सगळ्यात घर रिकामं होतं. त्यामुळे तुम्हाला खूप गर्दीतही एकटं वाटू शकतं. हे सगळं मी वयाच्या २६-२७ व्या वर्षी अनुभवत होतो. त्यात मी एक स्टार म्हणूनही सिनेमात आलो होतो. मला एवढं अटेन्शन मिळत होतं. पण तरी मी माझं वैयक्तिक आयुष्य बॅलन्स केले होते.”
तो पुढे म्हणाला, “आज आयुष्यातील या टप्प्यावर मला स्वत:ची काळजी घ्यायची आहे. गेल्या काही वर्षात प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात जे जे घडलंय त्यामुळे मी डिस्टर्ब होतो. त्यामुळे आता मला फक्त माझाच विचार करायचा आहे. रिलेशनशिपमध्ये चढ-उतार येतच असतात. जर ते नाही वर्क आऊट झालं तर त्याचाही स्वीकार केला पाहिजे. आज आयुष्यात आधीसारखा एकटेपणा नाही, पण मी रोज स्वत:ला आणखी चांगला होण्यासाठी मदत करत आहे.”
दरम्यान, दरम्यान, अर्जुनने 2012 मध्ये परिणीती चोप्रासोबत ‘इशकजादे’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘2 स्टेट्स’ आणि ‘गुंडे’मध्येही चमकदार अभिनय केला. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अर्जुन कपूरसोबतच अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, रवी किशन यांच्याही भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
हेही वाचा:
धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांवर एकता कपूरला आला,’राग’