पिंपरी – महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली “ह’ प्रभाग कार्यालयात मंगळवारी (दि.23) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय व आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे गैरहजर राहिल्याची तक्रार प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी केली आहे.
प्रभागातील कचरा समस्या भेडसावत असताना जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांनी महापौर जाधव व सहाय्यक आयुक्त आशा राऊत यांच्याकडे संताप व्यक्त करत, या अधिकाऱ्यांकडून खुलासा घ्यावा, अशी मागणी केली आहे. या बैठकीमध्ये प्रभागातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये कचरा समस्येमुळे हैराण झालेल्या रहिवाशांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी कांबळे यांनी केली. त्याकरिता वाहनसंख्या व वाहनावर सहाय्यकाची नेमणूक करण्याची मागणी केली.