नवी दिल्ली – माजी कसोटी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर व कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह अनेक जण करोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यातच आता इरफान व युसूफ या पठाण बंधूंचीही भर पडली आहे. ज्या लोकांच्या प्रेमाने आपल्याला मोठे केले त्यांचे आपण काही देणे लागतो या भावनेतून पठाण बंधूंनी करोनापासून बचाव व्हावा यासाठी लोकांना मोफत मास्कचे वाटप सुरू केले आहे.
करोना विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र तसेच सगळ्या राज्यांतील सरकारे जीवनावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद केल्या आहेत. यात प्रसारमाध्यमे, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व पोलीस यांना वगळून अन्य कोणालाही ऍक्टिव्ह राहण्यास मनाई केली आहे. रेल्वे, बस तसेच खासगी व सरकारी वाहतूक बंद केली आहे. या लॉकडाऊनच्या स्थितीतही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात जाणे भाग पडत आहे. त्यांच्या आरोग्यासाठी अशा व्यक्तक्तीना पठाण बंधूंकडून मोफत मास्क दिले जात आहेत.
Doing our bit for the society. Whatever u guys can do please go ahead and help each other as far as sanitation is concerned.But don’t gather crowd! @iamyusufpathan #corona it’s a small start hopefully we will be keep helping more. Everyone of us… pic.twitter.com/7oG7Sx4wfF
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 23, 2020
देशातच नव्हे तर जगभरात सर्वसामान्य व्यक्तींनाच विविध संकटांचा सामना जास्त करावा लागतो. श्रीमंत लोक पैशांच्या बळावर साठेबाजी करू शकतात. मात्र, मध्यमवर्गाला रोजची खरेदी करावी लागते. त्यांना घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घेता यावी यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे या बंधूंनी सांगितले आहे. याबाबत या बंधूंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला चाहत्यांनी प्रचंड लाईक्स दिले आहेत.
आपल्या वडिलांच्या नावे हे बंधू एक संस्था चालवत आहेत. त्याच माध्यमातून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून त्याबाबतची सामाजिक जाणीवही दाखविली आहे. बडोद्यात ही संस्था कार्यरत असून त्याअंतर्गत केवळ असा प्रसंगातील मास्क वाटपच नव्हे तर विविध योजना राबविल्या जातात.