“अंग्रेजी मिडियम’च्या शुटिंगदरम्यान इरफान खानची मस्ती

मेंदूतील विकारावारील उपचारानंतर भारतात परतलेल्या इरफान खानने आपल्या “अंग्रेजी मिडियम’च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. “हिंदी मिडियम’ या त्याच्या गाजलेल्या सिनेमाचा सिक्‍वेल असलेल्या “अंग्रेजी मिडियम’चे शुटिंग सध्या उदयपूरमध्ये सुरू आहे. या शुटिंगच्यावेळचे अनेक फोटो सोशल मिडीयावर आले अहेत. आपल्या फॅन्सना भेटून इरफान खानच्या चेहऱ्यावर एकदम फ्रेशनेस आला आहे. तो खूप खूष असल्याचे दिसते आहे. तो फॅन्सबरोबर मस्ती करण्याच्या मूडमध्ये असल्याचेही दिसते आहे.

कित्येक दिवस आपल्या फॅन्सपासून दूर राहिलेल्या इरफानला पुन्हा आपल्या जून्या रंगात आलेले बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. “अंग्रेजी मिडियम’मध्ये इरफानचे नाव मिस्टर चंपकजी आहे. त्याच्या मुलीचा रोल राधिका मदन करते आहे. तर इरफानच्या बायकोचा रोल करीना कपूर खान करते आहे. “हिंदी मिडियम’मध्ये आपल्या मुलाला इंग्रजी मिडियमच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपडणारा बाप इरफानने साकारला होता. आता त्याच्या या कथेचाच पुढचा भाग दिसणार की त्यापेक्षा वेगळी कथा पहायला मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.