भारतीय महिलांसमोर आयर्लंडचे आव्हान

महिला विश्‍वचषक हॉकी स्पर्धा

लंडन: पहिल्या सामन्यात खळबळजनक विजयाची संधी भारतीय महिला हॉकी संघाने दवडली. परंतु महिला विश्‍वचषक हॉकी स्पर्धेतील आज (गुरुवार) रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विश्‍वक्रमवारीत खालच्या स्थानावर असलेल्या आयर्लंडला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे. मात्र या सामन्यात विजयासाठी भारतीय महिलांना आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात विश्‍वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेऊनही विजयाची संधी दवडल्यामुळे ब गटांत अग्रस्थान मिळविण्याची त्यांची संधीही हुकली. इंग्लंडच्या महिला संघाने अखेरच्या क्षणी बरोबरी साधणारा गोल करीत पराभवाची नामुष्की टाळली आणि भारतीय महिलांना गुणविभागमीवर समाधान मानावे लागले.

आता विश्‍वक्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाला 16व्या क्रमांकावर असलेल्या दुय्यम दर्जाच्या आयर्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून पहिल्या सामन्यातील हुकलेल्या संधीची भरपाई करावी लागणार आहे. मात्र त्याच वेळी आयर्लंडविरुद्ध जराही गाफील राहिल्यास त्याची मोठी किंमत भारतीय महिला संघाला मोजावी लागण्याचीही शक्‍यता आहे.

आयल्रंडच्या महिला संघाने पहिल्या साखळी सामन्यात विश्‍वक्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेवर 3-1 असा सनसनाटी विजय मिळवून ब गटांत अग्रस्थानी झेप घेतली आहे. तर इंग्लंड व भारत संयुक्‍तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. उद्याच्या लढतीत आयर्लंडला कमी लेखण्याची चूक केल्यास भारतीय महिलांचे स्पर्धेतील आव्हानच धोक्‍यात येऊ शकेल. जोहानसबर्ग येथे झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगमध्ये आयर्लंडने भारतीय महिलांवर मात केली होती.

मात्र यावेळी त्या पराभवाची पुनरावृत्ती होणार नसल्याची ग्वाही अनुभवी गोलरक्षक सविताने दिली. गेल्या सामन्यातही आम्ही आघाडीवरून पराभूत झालो होतो. यावेळी तशी चूक आम्ही पुन्हा करणार नाही, अशी खात्री सविताने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)