बगदाद : इराकी भूमीवरील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती इराणने तोंडी संदेशाद्वारे दिली होती, असे इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी स्पष्ट केले.
आम्हाला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणकडून अधिकृत तोंडी मेसेज आला होता. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या यांच्या हत्येचा बदला घेण्यात येईल. त्याची सुरवात लवकरच करण्यात येईल आणि या हल्ल्याची व्याप्ती आम्ही इराकमधील अमेरिकच्या तळापुरती मर्यादित असेल, असे सांगून हल्ल्याच्या टार्गेटबाबत मौन बाळगण्यात आल होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने बुधावरी पहाटे अमेरिकेच्या इराकमधील तळांवर 22 क्षेपणास्त्रे डागली. अल अस्सद येथील तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यापासून आम्ही अमेरिकन प्रशासनाच्याही संपर्कात आहोत, असे या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यानंतर आम्ही इराकी फौजांना तत्पर राहण्यास सांगितले. मात्र या हल्ल्यात इराकच्या फौजेचे कोणतेही नुकसान झालेल नाही. आपल्या भूमीवर आणि आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याचा आक्षेप इराकने फेटाळला आहे. इराकचे परराष्ट्र मंत्री खुले युध्द होऊ नये म्हणून संबंधित देशाशी संपर्क साधून आहेत, असे या कार्यालयाने स्पष्ट केले.