अमेरिका-इराण वादामध्ये इराकची मध्यस्थी

बगदाद- अमेरिका आणि इराणमधील वादात इराकने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी दोन्ही संबंधित देशांची तयारी असावी, असे इराकच्या संसदेचे सभापती मोहम्मद हलबोसी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 साली इराणबरोबरच्या अणू करारातून माघार घेतल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्याच पार्श्‍वभुमीवर अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराणचे अर्थकारणच धोक्‍यात आले आहे. इराणबरोबरच्या अणू करारामुळे इराणची अण्वस्त्र निर्मितीची क्षमता नियंत्रित झाली नाही. . तसेच इराणकदून मध्यपूर्वेतील दहशतवाद्यांना होणारे सहकार्यही कमी झाले नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

दरम्यान इराणचे विदेशमंत्री झावेद झरिफ हे दोन दिवसांच्या भेटीसाठी इराकमध्ये दाखल झाले आहेत. इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी झरिफ यांना इफ्तारसाठी निमंत्रित केले. निर्बंध आणि संभाव्य युद्धामुळे शांतता भंग होऊ नये यासाठीच्या उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here