व्हिएन्ना : अणु कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या इराणच्या निर्णयामुळे चिंता वाढल्याचे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि युरोपीय संघान म्हटले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक कालच त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, इराणने फॉर्डो इथे युरोनियमचा साठा करायला सुरुवात केली असून आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीने ही बाब अहवालाद्वारे स्पष्ट केली आहे.
इराणचे हे पाऊल 2015 च्या संयुक्त व्यापक कार्य योजनेच्या विरुद्ध आहे. योजनेनुसार आर्थिक प्रतिबंध हटवण्याच्या बदल्यात युरेनियम साठा कमी करण्याबाबत सहमत होता. मात्र, अमेरिकेच्या एकतर्फी करार हटवल्यानंतर, कराराचे पालन करण्याची आता गरज नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
त्याशिवाय अणु कार्यक्रम नव्याने सुरू करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार इराणचे सर्वोच्च नेते आयोतोल्ला खोमेनी यांनी केला आहे. अणु करारापासून इराण अधिकाधिक दूर जाणार असून याबाबतची जबाबदारी आता या कराराशी संबंधित अन्य सहभागी पक्ष अर्थात फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि युरोपीय संघावर असल्याचेही इराणने म्हटले होते.