तेहरान: अमेरिकेकडून अटक केलेल्या इराणच्या वैज्ञानिकाला सोडून देण्यात आले असून आता हा वैज्ञानिक इराणच्या मार्गावर आहे, अशी माहिती इराणच्या विदेश मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
सायरस असगरी असे या वैज्ञानिकाचे नावे आहे. अमेरिकेत हेरगिरी केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. पण त्याचा आरोप सिद्ध न झाल्याने अमेरिकेच्या कोर्टाने त्याची सुटका करण्याचा आदेश दिला होता.
त्याला 12 डिसेंबरलाच इराणला परत पाठवले जाणार होते. पण तो आमचाच नागरिक असल्याची खात्री पटल्याशिवाय आम्ही त्याला परत घेणार नाही अशी भूमिका इराणने घेतली होती त्यामुळे त्याचे डिपोर्टेशन थांबले होते. त्याच्याकडे इराणी पासपोर्ट होता. त्याची पहाणी इराणच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर इराण सरकारने तो आपलाच नागरीक असल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याला परत पाठवण्याचे ठरले असतानाच इराणकडे जाणारी विमाने गेल्या दोन महिन्याच्या काळात रद्द झाल्याने त्याचे इराणला जाणे होते आता मात्र तो विमानात बसून इराणकडे रवाना झाला आहे.