इराणने पकडले ब्रिटनचे तेलवाहू टॅंकर

तेहरान – होर्मझच्या खाडीमध्ये ब्रिटनचे तेलवाहू टॅंकर ताब्यात घेतले असल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी नियमांच भंग केल्याबद्दल हे जहाज पकडले असल्याचे इराणने म्हटले आहे. होर्मोझगन पोर्ट आणि मेरिटाईम ऑर्गनायजेशनच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यत आली आहे, असे गार्डच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे. हा टॅंकर समुद्रकिनाऱ्यावर ओढून आणण्यात आला असून कायदेशीर प्रक्रियेनंतर मेरिटाईम ऑर्गनायजेशनच्या स्वाधीन करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपासाची आवश्‍यकता आहे, असेही या वेबसाईटने म्हटले आहे.

ब्रिटीश जहाजावरील भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न
इराणने पकडलेल्या ब्रिटनच्या स्टेन इम्पेरो या तेलवाहू टॅंकरवर असलेल्या 23 जणांमध्ये 18 भारतीय खलाशी देखील आहेत. या सर्व भारतीयांची सुटका करण्यात यावी आणि त्यांना मायदेशी परत पाठवण्यात यावे, यासाठी भारत सरकारकडून इराणशी संपर्क साधण्यात येत आहे. या जहाजावर 18 भारतीयांबरोबर रशिया, फिलीपाईन्स, लात्विया आणि अन्य देशांचे मिळून 5 कर्मचारीही आहेत. या जहाजाचा कॅप्टन भारतीय आहे, असे इराणच्या “आयआरएनए’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जहाज कंपनी स्टेना बल्कशी संपर्क साधला जाऊ शकलेला नाही. या जहाजाची इराणच्या मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक झाली आणि आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचा भंग केला म्हणून हे तेलवाहू जहाज ताब्यात घेण्यात आले असल्याचे इराणने म्हटले आहे.

या टॅंकरवर ब्रिटनच ध्वज आहे. हे जहाज लरकच्य बेटाजवळच्या अतिसंवेदनशील सागरी भागात असताना त्यास अखेरचा सिग्नल देण्यात आला होता. आखातातील घडामोडींबाबतची माहिती मिळाल्यावर ब्रिटनने या जहाजाबाबत तातडीने माहिती मागवली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पकडलेल्या इराणच्या दोन टॅंकरना आणखी 30 दिवस ताब्यात ठेवले जाईल, असे जिब्राल्टरच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर लगेचच इराणने ब्रिटनचे हे जहाज पकडले आहे.
दरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने गुरुवारी आणखी एक विदेशी टॅंकर पकडला आहे. या टॅंकरवर पनामाचा ध्वज लावलेला आहे. या जहाजावरून इराणच्या तेलाची तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)