Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणे इराणी कप ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रेस्ट ऑफ इंडिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली आहे. उभयसंघातील सामना 1 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम येथे होणार आहे.
दरम्यान, त्यापूर्वी सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना सोमवारी लखनौ येथील इराणी कप सामन्यात सहभागी होण्यासाठी भारतीय कसोटी संघातून रिलीज (मुक्त) करण्यात आले आहे. याबाबतची माहिती बीसीआयने ट्विटर (एक्स)च्या माध्यमातून दिली आहे.
मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज मुंबई संघाचा भाग असेल. या सामन्यात सर्फराजचा धाकटा भाऊ आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुशीर खानची सेवा मुंबईला मिळणार नाही. कार अपघातात झालेल्या दुखापतीतून मुशीर बरा होत आहे. मुशीर यांच्या कारला पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर आझमगडमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरातून लखनौला येत असताना अपघात झाला. यष्टिरक्षक फलंदाज जुरेल आणि डावखुरा वेगवान गोलंदाज दयाल रेस्ट ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करतील.
रेस्ट ऑफ इंडिया संघ : रुतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश. दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सर्फराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधत्राव (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, तनुसिंग कोटियन, हिम. , शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायझ.