इराणने बिनशर्त चर्चा करावी

वॉशिंग्टन- अमेरिका इराणबरोबर चर्चेला तयार आहे. मात्र इराणने या चर्चेसाठी कोणतीही अट घालता कामा नये, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये स्वीत्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत आयोजिअ संयुक्‍त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

इराणकडून केल्या जात असलेल्या कुटील कारवायांना सुधरवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न असाच सुरू राहणार आहे, असे पॉम्पेओ यांनी म्हटले आहे. मात्र अमेरिकेने नव्याने घातलेल्या निर्बंधांमुळे इराणने अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे.

इराणला सन्मानाने चर्चेला पाचारण केले जाणार असेल, तरच इराण अमेरिकेशी चर्चेस तयार आहे. त्यासाठी नव्याने घातलेल्या निर्बंधांचे ओझे हटवले जायला हवे, असे इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर पॉम्पेओ यांनी दाखवलेली चर्चेची तयारी म्हणजे आशेचा किरण समजली जात आहे. इराणविरोधातील संभाव्य संघर्षाची तयारी म्हणून अमेरिकेने आपली विमानवाहू नौका आणि लढाऊ विमाने आखातामध्ये पाठवून दिली आहे.

याशिवाय आणखी संरक्षण दले पर्शियन आखातामध्ये पाठवून दिली गेली आहेत. अमेरिकेची क्षेपणास्त्रसज्ज छोट्या नौकांची छायाचित्रेही आखाती देशांमधील प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.