इराणने अमेरिकेचे सतरा गुप्तहेर पकडले

वॉशिंग्टन – इराणने अमेरिकेसाठी काम करणाऱ्या 17 गुप्तहेरांना अटक केली असून त्यातील काही जणांना देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी या बाबत वृत्त दिले आहे. यावेळी सीआयएने उभारलेले हेरगिरीचे संपुर्ण नेटवर्कच आम्ही मोडून काढले असल्याचा दावा इराणने केला आहे.

अटकेत असलेले हेर इराणमधील संवेदनशील ठिकाणांवर कार्यरत होते. ज्यात आर्थिक, अण्विक, लष्करी आणि सायबर विभागामध्ये त्यांचा वावर अधिक होता असे मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. सीआयएकडून चालवले जाणारे सायबर हेरगिरीचे नेटवर्क उघड केल्याचा दावा जून महिन्यात इराणने केला होता. 17 जणांना झालेली अटक त्याच्याशीच संबंधित आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये असलेला तणाव याप्रकरणामुळे आणखीणच वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)