तेहरान – इराणने अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांच्या करोना लसीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला खामेनी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ही घोषणा केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आमचा त्या देशांवर विश्वास नाही. त्यांना या लसीची चाचणी दुसऱ्या देशांच्या जनतेवर घ्यायची आहे. माझी तर फ्रान्सच्या लसीवरही शंका आहे. मी त्यांच्यावरही विश्वास ठेऊ इच्छित नाही असेही त्यांनी म्हटले आहे. खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की आमचा करोनावरील लसीला विरोध नाही.
अन्य सुरक्षित देशांमधून या लसी आयात केल्या जाऊ शकतात आणि त्यांचा देशातील जनतेवर वापर केला जाऊ शकतो. इराणच्या लष्कराने तर विदेशातील कोणत्याच लसीचा इराणमध्ये वापर केला जाऊ नये अशी सुचना सरकारला केली आहे.