नवी दिल्ली – अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा लष्कर प्रमुख कासम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. यानंतर आता इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने इराकमध्ये असलेल्या अमेरिकन लष्कराच्या दोन हवाई तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. या हल्ल्याला अमेरिकेनेही दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आले आहे.
USA civil flights banned over the Gulf, Iraq and Iran: AFP news agency https://t.co/m7MdxD85pf
— ANI (@ANI) January 8, 2020
कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणानेही आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. दरम्यान, ७ जानेवारी रोजी ५.३० मिनिटांनी (ईएसटी) इराणनं इराकमधील लष्कराच्या हवाई तळांवर १२ पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे साहाय्यक जोनाथन हॉफमॅन यांनी दिली. ही क्षेपणास्त्र इराणकडून डागण्यात आली. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी लष्कराचं तळ हे त्यांचं लक्ष्य होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
US aircraft restricted from flying over Iraq, Iran, Persian Gulf
Read @ANI Story | https://t.co/n9Ny04Rce3 pic.twitter.com/9FX8VdtWdb
— ANI Digital (@ani_digital) January 8, 2020