इरा खानची पुन्हा सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

बॉलीवूडमधील परफेक्‍ट मॅन अर्थात अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान रिलेशनशिपमध्ये आहे. ती वडिलांचे फिटनेस कोच नुपूर शिखर यांना डेट करत आहे. याबाबत नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना हिंट दिली आहे. गतवर्षी इरा खानचे एक्‍स-बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)


इराने नुकताच मैत्रिणीसोबतचा एक मजेदार फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे तिचे एक वेगळेच रूप पहायला मिळत आहे.

यात ती आपली बेस्ट फ्रेंड डॅनियेला (Danielle)सोबत आहे. यामध्ये इरा आणि डॅनियेला वॉटरगन घेऊन काहीतरी करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर आमीर खानच्या दंगल चित्रपटातील अभिनेत्री फातिमा सना शेख हिने ‘क्युटी’ अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

जीन्स आणि ब्लॅक टॉप अशा साध्या वेशात असलेली इरा या फोटोत अतिशय निरागस आणि गोड दिसत आहे. ती आणि डॅनियेला दोघीही वॉटर गन घेऊन कसल्यातरी तयारीत असल्याचे दिसत आहे. लहान मुलांचा अवखळपणा त्यांच्यात दिसतो आहे. इराने दिलेल्या कॅप्शनमधूनही हा खेळकरपणा डोकावतो आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनीही लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आतापर्यंत आमीर खानची पहिली पत्नी आणि इरा खानची आई रिना दत्ता यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु नुपूरच्या आईने केलेल्या पोस्टवर इरा खान ही भाष्य करण्यास खूपच ऍक्‍टिव असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

दरम्यान, नुपूरने काही दिवसांपूर्वी आपल्या आईचा फोटो शेअर होता. ज्यावर इराने खूपच सुंदर कमेंट केली होती. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नुपूर शिखर हा एक सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमीर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना प्रशिक्षण देत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.