पुणे – भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) या वर्षी महाराष्ट्र संवर्गातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2003 च्या बॅचचे हे अधिकारी आहेत. त्यात पुण्यातील श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट) यांच्यासह प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पोलीस उपायुक्त झोन 5 ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि रश्मी करंदीकर ( एसपी नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा मिळाला आहे.
हे पाचही अधिकारी 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. आयपीएसचा दर्जा ज्येष्ठतेनुसार मिळतो. सचोटी आणि चांगले रेकॉर्ड आणि करिअर शीटवर एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही. या अधिकाऱ्यांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे. तर धिवरे यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट मधून 1997 मध्ये पत्रकारीतेची पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे.