पाटणा – “खाकी : द बिहार चॅप्टर’ ही वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. ही वेब सीरिज “बिहार डायरी’ या पुस्तकावर आधारीत असून बिहारमधील आईपीएस अधिकाऱ्याने त्याचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. दरम्यान, आता बिहारच्या विशेष दक्षता विभागाने आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याचं कारण म्हणजे अमित लोढा यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज तयार करण्यात आली आहे. शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर या कंपन्यांसोबत करार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंतिम पडताळणीचा करुन अहवाल दिल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत आयपीएस अधिकारी अमित लोढा यांना निलंबीत करण्यात आले आहे. या निलंबणाबाबत पोलिस मुख्यालयाने अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु आईपीएस अधिकाऱ्यांनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांमध्ये निलंबन निश्चित असल्याचे सांगितले.