मुंबई – सर्वोदय स्मॉल फायनान्स बॅंकेने 17 मार्चपासून गुंतवणूकदारांना प्राथमिक समभाग खरेदीसाठी उपलब्ध केले आहेत. या आयपीओमधील शेअरची किंमत बॅंकेन 303 ते 305 रुपये प्रति शेअर इतकी ठेवली आहे.
बॅंक या माध्यमातून 250 कोटी रुपये उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. 19 मार्चला शेअरची विक्री बंद होणार आहे. या बॅंकेचे काम जानेवारी 2017 रोजी सुरू झाले. सध्या या बॅंकेतील ठेवी 3,343 कोटी रुपये आहेत तर कर्ज पुरवठा 3908 कोटी रुपयांचा आहे.
दरम्यान 16 ते 18 मार्च दरम्यान दागिने क्षेत्रातील कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार असून या शेअरची किंमत 86 ते 87 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
अनुपम रसायन इंडिया या कंपनीच्या आयपीओमधील शेअर गुंतवणूकदारांसाठी 12 मार्च रोजी उपलब्ध करण्यात आले असून हा इश्यू 16 मार्च रोजी बंद होणार आहे. 12 मार्च रोजी पहिल्या दिवशी उपलब्ध शेअरच्या 1.29 पट मागणी उपलब्ध झाल्याचे दिसून आले.