#IPLAuction2021 : केदार जाधवकडे साफ दुर्लक्ष

चेन्नई – अमिरातीत गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेलच्या नावाची जादू आजही कायम असल्याचेच दिसून आले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मॅक्‍सवेलने सर्वाधिक किंमत मिळवली. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंडर बेंगळूरूने तब्बल 14.25 कोटी रुपये बोली लावून विकत घेतले. त्याचवेळी अनपेक्षितरीत्या दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला राजस्थानने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जास्त रक्कम देत तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांत विकत घेतले.

गेल्या वर्षीच्या स्पर्धेत संथ फलंदाजीमुळे सातत्याने टीकेचा धनी बनलेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्यावर कोणीही बोली लावली नाही व तो अनसोल्ड राहिला. सुमार कामगिरीमुळे त्याला चेन्नईने करारमुक्त केले होते.

केदारसह ऑस्ट्रेलियाचा ऍरन फिंच व भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीदेखील अनसोल्ड राहिले. तसेच इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयही अनसोल्ड राहिला. त्याला 2 कोटीच्या बेसप्राईसवरही कोणीही विकत घेण्यात रस दाखवला नाही. इंग्लंडचाचा स्टार खेळाडू अलेक्‍स हेल्स तसेच भारताचा करुण नायर यांच्यावर देखील कोणीही बोली लावली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.