मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या नव्या वर्षात होणारा लिलाव दि. 7 व दि. 8 फेब्रुवारी 2022 मध्ये बंगळुरू येथे होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहे. मात्र, करोना परिस्थिती पाहता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे; परंतु पुढील काही आठवड्यांमध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.
पुढील वर्षीच्या मोसमात आयपीएल स्पर्धेत लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. बीसीसीसीआय दोन्ही संघांना आयपीएल 2022 सालच्या मेगा लिलावात सर्वोत्तम संघ तयार करण्याची संधी मिळणार आहे. आठ मूळ संघांनीही काही खेळाडूंना कायम ठेवले असून नव्या काही खेळाडूंना लिलावात खरेदी करता येणार आहे. बीसीसीआयने अद्याप मेगा लिलावाची निश्चित तारीख जाहीर केली नसली, तरी आता एका नवीन अहवालानुसार आयपीएलचा पुढील वर्षासाठीचा लिलाव दि. 7 व 8 फेब्रुवारी रोजी घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बीसीसीआय सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृती स्थितीवर चर्चा करत आहे, जे अहमदाबादने विकत घेतल्यानंतर वादात सापडले होते. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी 5,600 कोटी रुपयांची दुसरी सर्वोच्च बोली लावली; परंतु सट्टेबाजी कंपन्यांशी त्यांच्या कथित संबंधांमुळे ते लवकरच बोर्डाच्या देखरेखीखाली आले.
लखनौ आणि अहमदाबादसाठी 1 डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी 33 कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी 3 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटींचे शुल्क घेऊ शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.