मुंबई : आज IPL 2022 चा शेवटचा लीग सामना म्हणजेच 70 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.
शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसन मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार कर्णधार आहे.
#SRH have won the toss and they will bat first against #PBKS
Live – https://t.co/qbGsqiPHrc #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Yc0JW6nvN6
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
हैदराबाद संघात दोन बदल करण्यात आले आहेत. केन विल्यमसनच्या जागी रोमारियो शेफर्ड आणि टी नटराजनच्या जागी जगदीश सुचित याचा समावेश करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये तीन बदल झाले आहेत. भानुका राजपक्षे, राहुल चहर आणि ऋषी धवन यांच्याजागी नॅथन एलिस, शाहरुख खान आणि प्रेरक मांकड यांची निवड करण्यात आली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :-
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (wk), रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (c), फझलहक फारुकी, उमरान मलिक, जगदीश सुचित
पंजाब किंग्ज प्लेइंग 11 : जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (c), लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (wk), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रेरक मंकड, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग