मुंबई – आयपीएल स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात बाद दिले गेल्यावर संतापलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने पंचांकडे पाहात गैरवर्तन केले होते. मैदानावरील पंचांनी त्याची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची गंभीर दकळ घेत शॉ याला सामना रकमेच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
रविवारी या स्पर्धेत झालेल्या सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. बाद झाल्यावर त्याने पंचांकडे पाहात विचित्र हातवारे तसेच हावभाव केले. त्याने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 या नियमाचा भंग केला.
शॉ याने आपली चूक मान्य केली. एखाद्या खेळाडूने विरोधी खेळाडू किंवा पंचांविरुद्ध कोणत्याही प्रकारचे हावभाव केल्यास त्याला दंड किंवा शिक्षा केली जाते. किंवा अपशब्द वापरले तर शिक्षा केली जाते.